थेंब
असं कधी होत नाही
मनापासून कागदापर्यंत पोहोचताना
विचारांना फुटतात नद्या अनेक
आणि रुंदावत जातात काठ
जाणिवांचे, क्षितिजांचे...
वाहताना दृष्टीस पडतात
कित्येक लेण्या आपल्याच आपल्यात,
त्यातील कोरीव शिल्पं दाखवतात
सृजनाचा आविष्कार.
कधी दिसतात काठावर वसलेली
व्हेल्लाळ स्वप्नांची, अपेक्षांची गावं
बांधून देतात शिदोऱ्या
आपणच साठवलेल्या आपल्यात.
तर कधी वाहवत येतात वाऱ्यासोबत
पुरलेल्या वासनांचे कुबट वास,
देऊन जातात मनाला
त्यांच्या शाश्वतीचे विकार.
कुठल्या वळणांवर पडतात नजरेस
काही खोलवर रुजलेल्या
संस्कारांची थोराड झाडं,
त्यांची पिवळी पानं-फुलं
मिसळतात विचारांच्या धारेत आपोआप
आणि कधी,
गवसतो आपणच आपल्याला
की असतो नुसताच आभास?
कित्येक लेण्या आपल्याच आपल्यात,
त्यातील कोरीव शिल्पं दाखवतात
सृजनाचा आविष्कार.
कधी दिसतात काठावर वसलेली
व्हेल्लाळ स्वप्नांची, अपेक्षांची गावं
बांधून देतात शिदोऱ्या
आपणच साठवलेल्या आपल्यात.
तर कधी वाहवत येतात वाऱ्यासोबत
पुरलेल्या वासनांचे कुबट वास,
देऊन जातात मनाला
त्यांच्या शाश्वतीचे विकार.
कुठल्या वळणांवर पडतात नजरेस
काही खोलवर रुजलेल्या
संस्कारांची थोराड झाडं,
त्यांची पिवळी पानं-फुलं
मिसळतात विचारांच्या धारेत आपोआप
आणि कधी,
गवसतो आपणच आपल्याला
की असतो नुसताच आभास?
मग होते ह्या साऱ्यांची गंगा
मिसळून एकमेकांत,
सारे दोष अंगी लेवूनही
पावित्र्य मिरवण्याचा शाप.
जेव्हा उतरते ती बोटांतून
मिळते कोऱ्या सफेद कागदात,
तेव्हा होतो साक्षात्कार
इवलासा उमटलेला थेंब मनातला
स्वतःला बदलूही शकतो सागरात
मिसळून एकमेकांत,
सारे दोष अंगी लेवूनही
पावित्र्य मिरवण्याचा शाप.
जेव्हा उतरते ती बोटांतून
मिळते कोऱ्या सफेद कागदात,
तेव्हा होतो साक्षात्कार
इवलासा उमटलेला थेंब मनातला
स्वतःला बदलूही शकतो सागरात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा