गीत
तू स्वरांनी साजवावे शब्द ते गीतामध्ये,
लेवुनी मग साज कोणी गुणगुणे कंठातुनी,
अन फुलावे गीत अपुले कोवळ्या ओठांवरी
मग स्फुरावे पंख त्याला, झेप घे गगनावरी,
ऐकती ते धुंद होती, मुग्ध त्या चालीवरी,
बांधुनी आनंद घरटी, वसतसे हृदयातुनी
घेतसे हळुवार झोका, फांदीवरी ध्यानीमनी
ऐकती ते धुंद होती, मुग्ध त्या चालीवरी,
बांधुनी आनंद घरटी, वसतसे हृदयातुनी
घेतसे हळुवार झोका, फांदीवरी ध्यानीमनी
रूप घेई ते कधी, होई सखी प्राणांतली,
वा बने वेल्हाळ होडी, गत-जुन्या पाण्यातली,
देतसे आशा कुणा कधी मुक्त ह्या जगण्यातली,
नेतसे गंधाळ स्वप्ने वाहुनी वाऱ्यावरी
वा बने वेल्हाळ होडी, गत-जुन्या पाण्यातली,
देतसे आशा कुणा कधी मुक्त ह्या जगण्यातली,
नेतसे गंधाळ स्वप्ने वाहुनी वाऱ्यावरी
आपुले गाणे असे पोहोचे नभाच्या अंतरी,
दरवळे आनंद त्याचा पसरुनि रानीवनी,
बरसूनी येतील धारा चिंबूनी धरणीवरी,
मातीत पुन्हा सुर-शब्द, भावनांना रुजवुनी.
दरवळे आनंद त्याचा पसरुनि रानीवनी,
बरसूनी येतील धारा चिंबूनी धरणीवरी,
मातीत पुन्हा सुर-शब्द, भावनांना रुजवुनी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा