गरज


फक्त एक कान लागतो कधीकधी
कदाचित, कुणाचाही
पण गरजेच्या वेळी
फक्त एक कान लागतो कधीकधी ..
कुठल्याही आकाराचा
लहान, मोठा, स्वच्छ , अस्वच्छ,
डावा, उजवा, कोणताही, कसाही ..
त्याची मेंदूशी नाळ जोडलेली असण्याची गरज नसते
किंवा कुठली पाळंमुळं
मनाशी जोडलेली असण्याची आवश्यकता नसते.
लागते फक्त एक पोकळी
आपल्या मनात जे खदखदत असतं,
आतवर जाऊन अडकलेलं असतं,
ते बाहेर काढून, त्या पोकळीत ओतण्यासाठी
अगदी काठोकाठ भरेस्तोवर ,
आपण रिते होईस्तोवर.
त्याबदल्यात 'कानदारा'कडून कसलीच नसते अपेक्षा
अथवा कुठल्याही अन्य अवयवाचा हस्तक्षेप
नको असते नजर कीव-कणवेची
नको असतात ओठ उपदेशाचे
नको असतात सांत्वनाचे स्पर्श
पण आपलुयातून आपल्याला हलकं व्हायला
फक्त एक कान लागतो कधीकधी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट