घायाळ मी हरिणी


सावज जे हुकले तुझ्या तीक्ष्ण वारांनी
जीव बचावीत नियतीच्या मारांनी
आज परत बघ आले आहे फिरुनी
जरी असेनही घायाळ मी हरिणी 

तू नको दिलासा खोटा  मजला दावू
उगाच नको हा व्यर्थ मुखवटा लावू
वाहिले मी मजला सार्थ मृत्युच्या चरणी
जरी असेनही घायाळ मी हरिणी

आज सूर्य बघ माझ्यासाठी गगनी,
भिजवी चंद्रही माझ्यासाठी धरणी,
उलटली कशी ही परत तुझ्यावर करणी 
जरी असेनही घायाळ मी हरिणी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट