खेळ
कोण काय हा खेळ खेळती कळसुत्रीच्या बाहुल्या
गंजल्या मनात फिरती पाठमोऱ्या सावल्या
साद घातली, कुणी न मागे तरी वाजती चाहुला
दिस रातीचा लपंडाव का कुणीच नाही पाहिला
झोप उश्याशी हितगुज सांगे मिटु न देती पापण्या
रातगारठा तरी अंगावरी दवबिंदूंच्या चांदण्या
मुक्त जरी अन् स्वच्छंदी तरी जड चिंतेच्या साखळ्या
धडधड छाती कशास करी ही पडता निव्वळ पाकळ्या
कोणाचे भय कसली भीती साऱ्या नुसत्या कल्पना
एकलकोंडे मन नट रचती नानाविध त्या संवेदना
बघ प्रतिबिंबी पाहशील तर तो अजाण कुणी पाहुणा
कधीच आला कधी ठाकला तुझिया देही राहण्या
मृत्यूचे भय कुणास नसते, तो तर घरचा पाहुणा
म्हणून का मग वाट पहावी उभे ठाकुनी अंगणा?
आज दिवस हा पुन्हा न होणे मग का सोडावी वासना?
चिंता ठेऊ उद्याचसाठी उदयास काही सांगण्या

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा