अर्ध्या वाटेवरती
जीवनातल्या मृदू क्षणांची घेउन शाल ऊबेशी
चालत आलो
आज इथवरी अर्ध्या वाटेवरती
कधी न कळली
कधीच भरली आयुष्याची झोळी
अनंत फुले,
काही पाचोळे नात्यांचे काही मोती
कधी मिळाली
झुळूक मायेची कधी सावली ओली
मैत्रीचे
माणिक मोती अनगत, काही रेशीम गाठी
काही गेले
अर्ध्यावरुनी, परतुनी वाऱ्यासंगे
उरले त्याचे
सोने झाले, लखलख डोळ्यापुढती
कीती भेटले,
कधी गवसले, काय कुणा सांगावे
कसे फेडूनी होतील साऱ्या उपाकारांचे देणे
कसे फेडूनी होतील साऱ्या उपाकारांचे देणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा