वाढदिवस

परत नव्याने रेष उलटली
आयुष्याच्या वाटेवरती
आज अचानक जाणवली ती
दूर दूरची पाऊल माती
कुठून कधीचे क्षणिक सोबती
आले इथवर मझ्यासंगे
काही सुखद तर काही ओले
हितगुज करती हळूच कानी
आज विसवले फांदीवरती
आठवणींचे अबोल पक्षी
किती मनोहर पंख पसरूनी
स्मरणातील गाती अनेक गाणी
आयुष्याची रित वेगळी
रेषांसंगे वर्षे सरती
साद घालती आज मनाला
जुन्या वेंधळ्या कातरवेळी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट