तु आलास...
गतजन्मीची गाठोडी आत्ताच तर दुमडून ठेवली
,
नात्यांची
जळमटे आत्ताच कुठं साफ झाली होती,
विझुन गेलेल्या
दिवसांची शेकोटी जरा कुठे थंड झाली
आणि तू आलास....
काळ्याशाम
नभातली निळाई कधीच उडून गेली आहे
हीरव्या मातीतली
दुलाई कधीच विरुन गेली आहे
कुठे असेलच
काही शिल्लक तर ते ही पुरुन गेलं आहे
आणि... आज
तू आलास....
कुठुन आणु
पुन्हा ते सारे जे खंगुन गेलं आहे
अश्वत्थाम्याच्या
जखमेसारखे रंगून गेलं आहे
शाप म्हणावा
की वरदान पण वास्तव हे आहे
की तू परत आलास.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा